पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटपेक्षा ऑलिम्पिक-राष्टकुल स्पर्धा कधीही भारीच: सेहवाग

विरेंद्र सेहवाग

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धा या क्रिकेटपेक्षाही महत्त्वपूर्ण असल्याचे विधान भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने केले आहे. क्रीडा क्षेत्रात क्रिकेटर्संच्या तुलनेत इतर खेळाडूंना फारच कमी सुविधा मिळते, याकडेही त्याने लक्ष वेधले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. 

WI vs IND : पंत की साहा? चर्चेवर गंभीर यांच परखड मत

सेहवाग म्हणाला की, मी नेहमीच ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेला  क्रिकेटपेक्षाही उच्च स्थान दिले आहे. मला वाटायचे या स्पर्धेतील खेळाडूंना उत्तम सुविधा मिळत असेल. पण वास्तवात परिस्थिती खूपच भयावह असल्याचे लक्षात आले. क्रिकेट खेळाडूंना जेवढ्या सुविधा मिळतात त्याच्या १० ते २० टक्के सुविधा देखील या खेळाडूंना मिळत नाहीत. आमच्यापेक्षा चांगल्या सुविधा या ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मिळायला हव्यात. 

WI vs IND : कोहलीला खुणावतोय आणखी एक 'विराट' विक्रम

क्रिकेटबद्दलचा आपला अनुभव शेअर करताना सेहवाग म्हणाला की, क्रिकेटच्या मैदानात प्रशिक्षकाला खूप महत्त्व असते. मात्र आम्ही त्यांना विशेष श्रेय देत नाही. इतर खेळात मात्र प्रशिक्षकाला खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचा उल्लेखही त्याने केला. राष्ट्रीय क्रीडी दिवसाच्या निमित्ताने 'उम्मीद' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात सेहवागने इतर खेळाडूंना दिलेला आदर आणि त्यांचा हक्काविषयी व्यक्त केलेली भावनाही खेळाडूंची उमेद वाढवणारी नक्कीच आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Virender Sehwag says Olympics and Commonwealth Games are much bigger and important than Cricket Tournaments