पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेहवागच्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी साधला पाकवर निशाणा

विरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग सोशल मीडिवर चांगलाच सक्रीय असतो. नुकताच त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक मजेदार फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे त्याने शेअर केलेल्या फोटावरुन नेटकरी पाकिस्तानला ट्रोल करत आहेत.  

सेहवागने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये भारत-पाकचा कोणताही संबंध नाही. पण विरुने धोतर आणि कुर्त्यामध्ये शेअर केलेल्या फोटोवर उमटणाऱ्या अनेक प्रतिक्रिया या पाकला ट्रोल करणाऱ्या आहेत. वीरूने कुर्ता आणि धोतरसह गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा देखील घातल्याचे दिसते. याशिवाय त्याने काळ्या रंगाचा चष्मा देखील घातला आहे. 'भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले!' या कॅप्शनसह त्याने हा फोटो शेअर केला आहे. 

जोफ्राला खिलाडूवृत्ती शिकवणाऱ्या अख्तरची युवीनं घेतली शाळा

सेहवागने टीम इंडियाकडून १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय सामने तर १९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८ हजार ५८६, एकदिवसीयमध्ये ८ हजार २७३ आणि टी-२० मध्ये ३९४ धावा केल्या आहेत. विरेंद्र सेहवागने कसोटीमध्ये दोनवेळा त्रिशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा सेहवाग एकमेव भारतीय फलंदाज आहे.

अ‍ॅशेसः कसोटीत पहिल्यांदाच १२ व्या खेळाडूने केली फलंदाजी