पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DDCA च्या कार्यक्रमात विराट-अनुष्काने घेतली जेटलींच्या पत्नीची सांत्वन भेट

विराट-अनुष्काने घेतली जेटली यांच्या पत्नी संगिता जेटली यांची सांत्वन भेट

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) ने गुरुवारी फिरोजशाह कोटला आंतरराष्ट्रीय स्टेडियमला दिवंगत भाजप नेते आणि माजी क्रीडा प्रशासक अरुण जेटली यांचे नाव दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गुरुवारी स्टेडियमच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात जेटली यांचे कुटुंबिय देखील उपस्थितीत होते.

धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार - निवड समिती प्रमुख

यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी जेटली यांच्या पत्नी संगिता जेटली यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील एका पॅव्हिलियन स्टँडला देण्यात आले आहे. या स्टँडच्या अनावरणप्रसंगी डीडीसीए अध्यक्ष रजत शर्मा यांनी जेटलींच्या आठवणीला उजाळा दिला.

'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस

ते म्हणाले की, ‘स्टेडियमधील एका स्टँडला विराटचे नाव देण्याचा निर्णय डिडीसीएने सर्व प्रथम जेटलींना सांगितला होता.  यावेळी जेटलींनी  निर्णय  योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले. एवढेच नाही तर सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात विराट कोहलीसारखा सर्वोत्तम खेळाडू दिसत नाही, असे जेटली म्हणाले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Virat kohli with wife anushka sharma meets arun Jaitleys wife and put thier condolences at DDCA program in delhi