पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट या रुपात छोट्या पडद्यावर उतरण्यास सज्ज

विराट कोहली या रुपात छोट्या रुपात उतरणार आहे

क्रिकेटच्या मैदानातील रन मशिन आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच छोट्या पडद्यावर मनोरंजन करताना दिसणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील सुपर हिरो विराट कोहली 'सुपर व्ही' या सीरिजच्या माध्यमातून अ‍ॅनिमेटेड पात्राच्या रुपात छोट्या मुलांचे मनोरंजन करताना दिसेल.  

PKL 7 : बंगाल वॉरियर्सने फायनल युद्ध जिंकले!

 ५ नोव्हेबरला विराट कोहलीचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी या सीरिजचे टेलिव्हिजनवर प्रीमियर होणार आहे. सध्याच्या घडीच्या सुपर हिरोंना अ‍ॅनिमेशनच्या रुपात उतरवण्यासाठी स्टार इंडिया नेटवर्कने ही भन्नाट संकल्पना आणली आहे. यासंदर्भात कोहली म्हणाला की, लहानपनापासूनच सुपर हिरोची पात्रे मला आकर्षित करायची. अ‍ॅनिमेशन लहान मुलांपर्यंत पोहचण्याचे एक उत्तम साधन आहे. स्टार इंडियाच्या माध्यमातून ही सीरिज सर्व वयोगटातील लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असे विराटने म्हटले आहे.  

गांगुलीनं मनावर घेतलं तर पुजारा-रहाणेचं वेतन वाढेल

१३ भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या सीरिजमध्ये अ‍ॅक्शन आणि विनोदी तडक्याचा सुरेख संगम असून आठवड्यातून एकदा ही सीरिज प्रदर्शित होईल. याचे प्रसारण हॉटस्टार, स्टार प्लस, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिज्नी चॅनेलवह होईल.