पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेमीफायनलमधील पराभवानंतर कोहली विश्रांतीच्या मूडमध्ये नाही

विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली विश्वचषक स्पर्धेनंतर विश्रांती घेणार असल्याचे वृत्त होते. मात्र सेमीफायनलमधील पराभवानंतर आता कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघासोबत राहणार असल्याचे वृत्त आहे. 

३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यादरम्यान भारतीय संघ ३ टी-२० सामने, ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या संपूर्ण दौऱ्यात कोहली संघासोबत राहणार असल्याचे वृत्त आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १९ जूलैला भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. यावेळी चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. 

दोन दिवसांत धोनीच्या भविष्याचा कल समजणार

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार समजण्यात येत होते. मात्र, पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली चांगलाच हताश झाल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय भारताच्या नेतृत्वबदलाची चर्चा देखील रंगली होती. कोहलीकडे कसोटी संघाचे तर रोहितकडे टी-२० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडीवेळी हे चित्र देखील स्पष्ट होईल.

INDvsWI: ३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक