पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दिसणार नाही, तर...

विराट कोहलीच्या संघाच नाव बदलणार

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील स्पर्धा महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा संघ नव्या रंगात मैदानात उतरणार असल्याचे दिसते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात संकेत दिले आहेत. संघ नवे नाव आणि नव्या लोगोसह यंदाच्या स्पर्धेत उतरल्याचे पाहायला मिळू शकते.  

मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यासह अन्य तगडे खेळाडू असून देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाहीत. मागील दोन हंगामातही त्यांनी निराशाजनक खेळ केल्याचे पाहायला मिळाले होते. स्पर्धेच्या सुरुवातीला संघ प्रबळ दावेदार मानला जातो. पण स्पर्धा संपताना विराटचा संघ गुणतालिकेत तळाला असतो. 

'बेबी मफलरमॅन'ला शपथविधीसाठी आग्रहाचं आमंत्रण

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत नव्या बदलासह चमत्कार करण्याच्या दिशेने संघाची वाटचाल सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फेसबुक, ट्विटर आणि इन्टाग्रामवरील पूर्वीचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. यातून ते नव्या लोगो आणि नव्या नावासह यंदाच्या स्पर्धेत उतरणार असल्याचे संकेत मिळतात. १६ फेब्रुवारीला संघ आपल्या नव्या नावाची आणि लोगोची घोषणा करणार आहे.  

काश्मीरमध्ये पंचायत निवडणूक जाहीर, ३७० हटविल्यानंतर पहिली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यंदाच्या संघात २१ खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या हंगामातील कमी खेळाडू असलेला संघ असा अनोखा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावे आहे. आयपीएलच्या लिलावावेळी त्यांच्याकडे ६ कोटी ४० लाख इतकी रक्कम शिल्लक होती. यात त्यांना आणखी चार खेळाडू ताफ्यात घेणे शक्य झाले असते पण संघ व्यवस्थापनाने यात रस दाखवला नाही.