पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिकचा साखरपुडा अन् कॅप्टन कोहलीला आश्चर्याचा सुखद धक्का

 हार्दिकचा साखरपुडा अन् कॅप्टन कोहलीला आश्चर्याचा सुखद धक्का

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार अखेर मिळाला आहे. हार्दिकनं नववर्षांच्या पहिल्या दिवशी साखरपुडा करत तमाम चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही  हार्दिकची 'गूड न्यूज' ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक

हार्दिक पांड्यानं सर्बियाची मॉडेल नताशा स्टेनकोविचशी  साखरपुडा केला. दुबईमध्ये त्यांनी साखरपुडा केल्याचे समजते आहे. हार्दिकनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नताशासोबतचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत खास अंदाजात ही आनंदाची  बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर अल्पावधीतच देशातील हार्दिकच्या लाखो चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

हार्दिक पांड्यानं केला साखरपुडा

विशेष म्हणजे  कर्णधार विराट कोहलीलाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.  त्यानं हार्दिकच्या पोस्टवर  आनंद व्यक्त करत जोडप्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रवी शास्त्रीचा शाहरुख-रविनासोबत नवीन वर्षाचा जल्लोष