पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीनं निवडली आपली प्रो-कबड्डीची टीम

विराट कोहली

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. विराट कोहलीनेही रविवारी कबड्डीच्या मैदानात उपस्थिती लावली होती. दरम्यान प्रो कबड्डीच्या मैदानात त्याने आपली टीमही निवडली. तो या टीमचा भाग नाही हे विशेष.

विराट कोहलीने विचारपूर्वक आपल्या टीममधील सात नावे सांगितली. यात त्याने महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत यांचा समावेश आहे. यावेळी तो म्हणाला की, कबड्डी हा ताकदीचा खेळ आहे. त्यामुळे धोनी माझ्या टीममध्ये असणे अंत्यत गरजेचे आहे. त्यानंतर त्याने जडेजा उमेश यादव, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुलला आपल्या संघात स्थान दिले. विशेष म्हणजे आपल्या संघात त्याने स्वत:ला स्थान दिले नाही. 

धोनीप्रमाणेच उमेश यादव ही ताकदीचा खेळाडू असल्याचे कोहली म्हणाला. बुमराह उत्तमरित्या चढाई करु शकेल, असे वाटते. निवडलेले सर्व सात खेळाडू माझ्यापेक्षा अधिक ताकदीचे आहेत, त्यामुळे माझे संघात स्थान नाही, असेही त्याने स्पष्ट केले. दरम्यान प्रो कबड्डीच्या मैदानातील राहुल चौधरीने प्रभावित केल्याचीही कोहलीने सांगितले. राहुल चौधरी प्रो कबड्डीतील आघाडीचा खेळाडू असल्याचेही विराट यावेळी म्हणाला. 
 

विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:virat kohli picks his kabaddi team comprising cricketers ms dhoni and ravindra jadeja included in the team