पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट भारी की स्मिथ? सोशल मीडियावर रंगली चर्चा

कोहली आणि स्मिथ

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात कोण भारी? हा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. अ‍ॅशेस मालिकेतील स्टिव्ह स्मिथने दोन्ही डावात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा स्मिथ-कोहली यांच्यात सर्वोत्तम कोण? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगण्यास सुरुवात झाली आहे.  

आपापल्या टीमकडून ही दोघही दमदार कामगिरी करताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे स्मिथनं एक वर्षाच्या बंदीनंतर दमदार कमबॅक करत स्वत:ला सिद्ध केले आहे. स्मिथला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेट मानले जात आहे. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कठिण परिस्थितीत संघासाठी कसोटी शतके ठोकली आहेत.दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सातत्यपूर्ण चांगली खेळी करताना पाहायला मिळते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने ६० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

 

Ashes 2019 : स्टम्पला चेंडू लागूनही जो रुट नाबाद!

एक वर्षाच्या बंदीनंतर विश्वचषकात विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना स्मिथला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. मात्र अ‍ॅशेस मालिकेच्या सुरुवातीपासूनच तो लयीत दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आघाडी कोलमडल्यानंतर संघाचा डाव सावरत त्याने १४४ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात स्मिथने पुन्हा संघाला सावरत १४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. स्मिथच्या या शतकानंतर विराट आणि त्याच्यात कोण सर्वोत्तम या चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर कसोटीत स्मिथ तर एकदिवसीय सामन्यात कोहली सर्वोत्तम असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

हिटमॅन रोहितच्या नावे षटकारांचा विक्रम, गेलला टाकले मागे