चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सर्व प्रकारातील क्रीडा स्पर्धांवर संकट ओढावले आहे. देशव्यापी लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला असून आयपीएल स्पर्धेसंदर्भातील निर्णयही गुलदस्त्यातच आहे. कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय क्रिकेट खेळाडूंवर सक्तीच्या विश्रांतीची वेळ आली आहे. दरम्यानच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील सामना निश्चित जिंकू : शास्त्री
नुकतेच युजवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांनी इन्स्टाग्रामवरील लाइव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्याच खेळ खेळला. यावेळी दोघांच्यामध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी चहलने आपल्या सहकाऱ्याला क्रिकेटच्या मैदानातील तू कोणासोबत अधिक जवळीक साधली आहेस? असा प्रश्न विचारला. यावर शमीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव सांगितले.
जुने सामने पाहून कंटाळलोय! खेळ पुन्हा सुरु करायला हवा : ट्रम्प
कोहली दिल्लीकर आहे म्हणून माझ्या तो अधिक जवळ नाही तर त्याची बोलण्याची शैली आणि गंमतीशीर अंदाज मला अधिक भावूक करतो, असेही शमीने स्पष्टीकरण दिले.
मोहम्मद शमी म्हणाला की, मी आणि रोहित शर्माने कसोटीमध्ये सोबत पदार्पण केले असले तरी आमच्यात खूप चांगली जवळीक नाही. आमच्यात फारसा संवाद होत नाही. तसेच मजाक-मस्तीचा प्रकारही सहसा घडत नाही, असेही शमीने म्हटले आहे. दुसरीकडे विराटसोबत मैदानातच नव्हे तर फोनवरुनही गप्पा सुरुच असतात, असेही तो म्हणाला.