पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॉर्गनची फटकेबाजी, 'विराट पेक्षा रुटच भारी'

विराट कोहली आणि जो रुट

इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इयोन मोर्गनने विराट कोहलीपेक्षा आपला संघ सहकारी जो रुट सर्वश्रेष्ट असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्याने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरपेक्षा ब्रायन लारा सर्वोत्तम असल्याचे सांगितले. ईएसपीएन क्रिकइंन्फोमधील रेपिड फायर राउंडमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने भारतीय क्रिकेटर्सपेक्षा आपल्या आणि इतर देशाच्या खेळाडूंना पंसती दिली. ज्यावेळी त्याला भारताचा रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स यांच्यातील कोणता खेळाडू अधिक आवडतो, असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबीला पसंती दिली.

IPL2019, CSKvsDC: जाणून घ्या आकड्यांच्या खेळातील 'बाजीगर' कोण?

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील तुलनेत मात्र मॉर्गनने भारतातील आयपीएलला पसंती दिली. बिग बॅग लीग पेक्षा त्याला आयपीएल भन्नाट वाटते. पाकिस्तानच्या संघापेक्षा भारतीय संघ वर्चढ असल्याचेही मॉर्गनने यावेळी म्हटले आहे. रेपिड फायर राउंडमध्ये मॉर्गनला स्पायडर मॅन विरुद्ध सुपर मॅन, भारतीय अन्नपदार्थ आणि इंग्लंडमधील अन्न पदार्थ, प्रिन्स विलियम विरुद्ध प्रिन्स हॅरी, इतर खेळातील रग्बी विरुद्ध गोल्फ यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. 

लवकरच भारतीय क्रिकेटर्स संघटनेची स्थापना होणार

या कार्यक्रमात त्याने घरच्या मैदानावर रंगणाऱ्या आगामी विश्वचषक जिंकून नवा इतिहास घडवू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. आगामी विश्वचषकात इंग्लंडच्या नेतृत्वाची धूरा मॉर्गनच्या खांद्यावर आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Virat Kohli or Joe Root Sachin Tendulkar or Brian Lara England captain Eoin Morgan reveals his choice