पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटची एक चूक त्याच्यासह भारताची डोकेदुखी वाढवू शकते

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानातील आपल्या धमाकेदार फलंदाजीप्रमाणेच आक्रमक स्वभावाने देखील ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला आयसीसीने ताकीद दिली आहे. नुसती ताकीद न देता यावेळी त्याच्या खात्यात नकारात्मक गुणाची (डिमेरिट पॉइंट) भरही पडली. भारतीय डावातील पाचव्या षटकात धाव घेत असताना कोहलीने आफ्रिकेच्या बी हेंड्रिक्सला धक्का दिला होता.  

INDvsSA: फॅक्चर बुमराहने घेतली कसोटीतून माघार

याप्रकरणात आयसीसीने विराटला आचार संहिता लेवल १ प्रमाणे दोषी ठरवले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये आयसीसीचे नवे नियम लागू केल्यापासून कोहलीला नकारात्मक गुण देण्याची ही तिसरी वेळ आहे. विराटच्या नावे आतापर्यंत ३ नकारात्मक गुण जमा झाले आहेत. २४ महिन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक नकारात्मक गुण जमा झाल्यास आयसीसीकडून निलंबनाची कारवाई केली जाते. त्यामुळे जानेवारी २०२० पर्यंत विराटला मैदानातील आपल्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.    

धोनीही एका दिवसात तयार झाला नाही, युवीकडून पंतची पाठराखण

दोन नकारात्मक गुणांच्या पार्श्वभूमीवर एक कसोटी सामना किंवा दोन एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यावर बंदीची कारवाई केली जाते. जो सामना पहिल्यांदा खेळवण्यात येतो त्यावेळी ही कारवाई केली जाते. भारतीय संघ २ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये भारतीय संघ टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार असून जानेवारीमध्ये झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत घरच्या मैदानावर भारतीय संघाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांचा विचार करता विराट कोहलीला आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल..