पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगवी जर्सी परिधान करणे अभिमानास्पदः कोहली

विराट कोहली

विश्वचषकात टीम इंडियाच्या नव्या भगव्या जर्सीवरुन एकीकडे राजकीय वर्तुळात वाद होत आहे. तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने या जर्सीचे मोठे कौतुक केले आहे. टीम इंडिया भगव्या रंगाची ही जर्सी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रविवारी परिधान करणार आहे. टीमसाठी हे एक स्मार्ट किट आहे आणि खेळाडूंना ते खूप पसंत पडल्याचे कोहलीने माध्यमांना सांगितले. 

तो म्हणाला, खेळासाठी हा बदल खूप चांगला आहे. मला वाटत नाही की टीमसाठी कायमची हीच जर्सी करण्यासाठी कोणता प्रयत्न केला जाईल. कारण निळा हा आमचा कायमचा रंग राहिलेला आहे. नवीन जर्सी घालणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

यावेळी कोहलीने महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करताना म्हटले की, कधी काय करायचे असते हे त्याला माहीत असते. तो असा क्रिकेटपटू आहे की, त्याला काही सांगावे लागत नाही. चेंज रुममध्येही त्याच्याबरोबरचा अनुभव खूप महत्वाचा असतो.

आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, तो नेहमी टीमबरोबर असतो. एखादा वेळी जरी त्याने चांगली कामगिरी केली नाही तरी त्याचा काही फरक पडत नाही. त्याने नेटवर खूप सराव केला. त्याच्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना आम्ही जिंकलो, असेही तो म्हणाला.