पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

U19 WC : त्यावेळी विराटचं नेतृत्व ठरलं होतं विल्यम्सनपेक्षाही भारी

विराट कोहली आणि केन विल्यम्सन

साखळी फेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. उपांत्य फेरीत भारतासमोर आता न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाऊस भारी ठरला होता. त्यामुळे सेमीफायनलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. याशिवाय विराट कोहली आणि केन विल्यम्सन हे दोघे ११ वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये समोरासमोर येणार आहेत. यात कोण भारी ठरेल, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

ICC WC उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडशी भिडणार

विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे साखळी सामन्यातील पुनरावृत्ती दिसणार नाही. शिवाय राखीव दिवसातही पावसाचा मारा झाला तर भारतीय संघालाच याचा लाभ मिळेल. जर पावसामुळे सामन्याचा राखीव दिवसही वाया गेला तर गुणतालिकेतील गुणांच्या आधारावर अंतिम सामन्यात कोण जाणार याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे भारतीय संघ थेट अंतिम फेरी गाठेल. 

WC #INDvSL: पाच खास अन् अनोख्या विक्रमांवर एक नजर!

या सामन्यात विराट कोहली आणि केन विलियमसन यांच्यात एक कमालीचा योगायोग पाहायला मिळणार आहे. २००८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये  भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार  केन विल्यम्सन समोरासमोर आले होते. या सामन्यात भारताने ३ गडी राखून विजय मिळवला होता.