पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Wisdens T20i Decade: भारताचे दोन मोहरे संघात, पाकच्या एकाला स्थान नाही

जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली

विस्डेन क्रिकेटच्या दशकातील टी-२० संघात कर्णधार विराट कोहलीसह भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान मिळाले आहे. यापूर्वी विराटने विस्डेनच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थान तर कसोटी संघातही स्थान मिळवले होते. विस्डेनच्या कसोटी संघात देखील भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश होता. कसोटीसंघात अश्विनला स्थान देणाऱ्या विस्डेनने टी-२० मध्ये जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहाला पसंती दिली आहे. रोहित शर्मा आणि एमएस धोनीला टी-२० मध्येही स्थान मिळालेले नाही. 

Video : दिल्ली क्रिकेटची देखरेख करणाऱ्या 'जंटलमन्स'मध्ये राडा

विस्डेनने टी-२० संघाच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचकडे नेतृत्व दिले आहे. फिंचसह कॉलिन मुन्रोला सलामीला पसंती देण्यात आली असून विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली तर त्याच्या क्रमवारीत बदल करण्यास वाव असल्याचेही विस्डेनने म्हटले आहे.  

भारत दौऱ्यासाठी ऑसी संघात बदल, या शिलेदारांना आव्हान पेलणार का?

धोनी क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्कष्ट यष्टिरक्षकापैकी एक असला तरी विस्डेनने त्याच्या ऐवजी इंग्लंडच्या जोस बटलरला यष्टिरक्षक म्हणून निवडले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अधिक भरणा असलेल्या संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. विस्डेनच्या टी-२० संघात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक तीन, भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान संघातील प्रत्येकी दोन, तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या एका खेळाडूचा सहभाग आहे. पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. 

विस्डेन टी-२० संघ

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार, ऑस्ट्रेलिया) )
कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड) 
विराट कोहली (भारत) 
शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
जोस बटलर (यष्टिरक्षक, इंग्लंड) 
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)
डेव्हिड वेली (इंग्लंड) 
राशिद खान (अफगाणिस्तान)
 जसप्रीत बुमराह (भारत) 
लसिथ मलिंगा (श्रीलंका)