पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विस्डेनच्या टॉप ५ क्रिकेटर्समध्ये विराट कोहली

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला विस्डेन क्रिकेटने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या टॉप पाच जणांच्या यादीत स्थान दिले आहे. उर्वरित खेळांडूमध्येही दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. कोहलीशिवाय दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटमधील अष्टपैलू अ‍ॅलिस पेरीचा या यादीत समावेश आहे. कोहलीने मागील दहा वर्षांत कोणत्याही इतर खेळाडूंच्या तुलनेत ५७७५ अधिक धावा केल्या आहेत आणि तो दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला आहे. 

होय, हिंदू असल्यामुळेच मला पाक संघात भेदभाव सहन करावा लागलाः कनेरिया

३१ वर्षीय विराटला दशकातील विस्डेन कसोटी टीमचा कर्णधार केले आहे. तर वनडे टीममध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. विस्डेनने त्याला प्रतिभाशाली खेळाडू म्हटले आहे. इंग्लंडच्या २०१४ च्या दौऱ्याच्या अखेरपासून बांगलादेशविरुद्धच्या नोव्हेंबरमधील कोलकाता कसोटीपर्यंत त्याने आतापर्यंत ६३ च्या सरासरीने धावा बनवल्या. यात २१ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंना आशिया XI मध्ये 'नो एंट्री'

तो तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारात किमान ५० च्या सरासरीने धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे, असे विस्डेनने म्हटले आहे. नुकताच स्टीव्ह स्मिथनेही विराटसारखा दुसरा कोणीच नसल्याचे म्हटले होते. विस्डेननुसार, सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आणि महेंद्रसिंह धोनी करिअरच्या अखेरच्या टप्प्याकडे गेल्यानंतर जगात असा एकही क्रिकेटर नाही जो दबावात कोहलीसारखा खेळतो.

भारत असुरक्षित म्हणणाऱ्या PCB अध्यक्षाला BCCI च्या अधिकाऱ्याने फटकारले

कोहलीने मागील एक दशकात कसोटीत २७ शतकांच्या मदतीने ७२०२ धावा केल्या आहेत. त्याने वनडेमध्ये १११२५ आणि टी-२० मध्ये २६३३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकांची नोंद आहे. त्याच्यापुढे आता केवळ तेंडुलकर (१००) आणि रिकी पाँटिंग (७१) हे दोघेच आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:virat kohli is only indian to make place in top five cricketers by wisden here is entire list