भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर सोशल मीडियावर देखील आघाडीवर आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत विराट अव्वलस्थानी आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हजार धावांचा टप्पा पार केलाय. असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
हिमा दासच्या 'सुवर्ण' षटकारासह मोहम्मद अनसचीही सोनेरी धाव
क्रिकेटच्या सर्व प्रकारात अव्वल खेळीनं प्रभावित करणाऱ्या कोहलीनं सोशल मीडियावरील ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर चांगलाच सक्रीय असतो. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर त्याचे प्रत्येकी ३-३ कोटीपेक्षाही अधिर फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या क्रिकटर्सच्या यादीत विराट कोहलीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा नंबर लागतो. सचिन तेंडुलकरचे ट्विटरव ३ कोटी, फेसबुकवर २.८ कोटी तर इन्स्टावर १.१६ कोटी फॉलोवर्स आहेत.
Video : इंग्लंडच्या महिला क्रिकेटरकडून स्मिथची 'नक्कल'
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसतो. तरी देखील तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीचे इन्स्टावर १.५४, ट्विटरवर ७७ लाख, तर फेसबुकवर २.०५ फॉलोवर्स आहेत. भारताचा सलमीवीर हिटमॅन रोहित शर्माचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर प्रत्येकी १ कोटीपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.