पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल्प विश्रांतीनंतर विराटच्या भात्यातून अखेर शतक निघाले

विराट कोहली

India vs West Indies: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) भात्यातून अल्प विश्रांतीनंतर आणखी एक शतक पाहायला मिळाले. गेल्या काही सामन्यात त्याला अर्धशतकाचे शतकात रुपातंर करण्यात अपयश येत होते. विंडीज विरुद्धच्या सामन्यात मात्र तो शतकी खेळी करण्यात यशस्वी ठरला. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने एकदिवसीय कारकिर्दितील आपले ४२ वे शतक साजरे केले. 

विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने सलग पाच अर्धशतके झळकावली होती. यावेळी त्याच्या शतकाची हुलकावणी त्याच्या चाहत्यांसह तमाम क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला होता. विंडीज विरुद्ध विराट कोहलीचे हे आठवे शतक आहे. आपल्या १२० धावांच्या खेळीत विराट कोहलीने १४ चौकार आणि एक षटकार खेचला. विराटच्या भात्यातून निघालेले शतक हे २२९ डावात निघाले. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला ४२ एकदिवसीय शतके लगावण्यासाठी तब्बल ४०६ वेळा मैदानात उतरावे लागले होते. सर्वात जलदगतीने ४२ एकदिवसीय शतके लगावण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला. 

WI vs IND 2nd ODI सामन्याचे संपूर्ण अपडेट्स 

याशिवाय विराटने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. विंडीजविरुद्ध २ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट पहिला फलंदाज आहे. विराटने विंडीज विरुद्ध ३४ डावात २ हजार धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्द ३७ डावात २ हजार धावांचा टप्पा गाठला होता.  विंडीज विरुद्ध विराटचे हे आठवे शतक आहे. यापूर्वी त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध असा पराक्रम केला आहे. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक नऊ शतके लगावली आहेत. विडींज विरुद्ध सर्वाधिक शतके आता विराटच्या नावे आहेत. दक्षिण आफ्रिकेचा आमला , हर्षल गिब्ज (५) आणि एबी डिव्हिलियर्स यांनी विंडीजविरुद्ध प्रत्येकी पाच-पाच शतके लगावली आहेत.