पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनुष्कानंतर आता विराटचाही होणार सन्मान

विराट कोहली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वलस्थान कायम राखण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 

निवृत्तीच्या वक्तव्यावरुन मलिंगाचा यू-टर्न

बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असलेल्या विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराला 'पेटा पर्सन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विराट कोहलीने आमेर जिल्ह्यात सवारीसाठी वापरण्यात येणाऱ्या हत्तीसंदर्भात पेटा इंडियाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. या हत्तीला आठ लोकांनी मारहाण केली होती. जनावरांना खरेदी करण्यापेक्षा त्यांना दत्तक घ्या, असे आवाहन देखील कोहलीने केले होते. 

स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय

२०१७ मध्ये अनुष्काला 'पेटा पर्सन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१५ मध्ये पेटाने अनुष्काला हॉटेस्ट वेजीटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कार दिला होता.