पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्रावरही विराट अव्वल; एका पोस्टसाठी कमावतो तब्बल १.३६ कोटी

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त क्रिकेटच्या मैदानावर नाही तर इन्स्टाग्रामच्या पिचवर देखील हीट आहे. हे खरं आहे कारण विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टला जगातील सर्वाधिक पैसे कमवणारा क्रिकेटर आहे. क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या या यादीमध्ये विराट नवव्या क्रमांकावर असला आहे. तरी सुध्दा या यादीमध्ये पहिल्या १० मध्ये असणारा विराट हा जगातील एकमेव क्रिकेटर आहे. पोर्तुगालचा प्रसिध्द फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये पहिल्या १० क्रमांकावर ८ जागेवर फुटबॉलपटू आहेत. 

बलात्कार प्रकरणातील आरोपात रोनाल्डोला दिलासा

अमेरिकेचे बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स या यादीमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर ब्राजीलचे फुलबॉलपटू नेमार आणि अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू मेस्सी तिसऱ्या यांचा क्रमांक येतो. इंग्लडचे माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. हॉपरएचक्यू डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने सोशल मीडियावर आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून जवळपास १५८,००० पौंड म्हणजे १.३६ कोटींची कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे ३६ मिलियन म्हणजे ३.६ कोटी फॉलोअर्स आहेत.  

मुंबईमध्ये पावसाची बँटिंग सुरुच; मध्य आणि हार्बर रेल्वे उशीराने