पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरच्या मैदानात विराटचा तिसऱ्यांदा भोपळा!

विराट कोहली

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीलाच अबू जायदने भारताला दोन मोठे धक्के दिले. चेतेश्वर पुजारा अर्धशतकी खेळीनंतर अबू जायदच्या जाळ्यात अडकला. सैफ हुसेनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीला अबू जायदने खातेही उघडू दिले नाही.
घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यात विराट तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

IPL 2020: दोघांच्या बदल्यात 'रॉयल' अजिंक्य दिल्लीचं 'कॅपिटल' 

२०१६-१७ मध्ये पुण्याच्या मैदानात मिचेल स्टार्कने विराटला खातेही उघडू दिले नव्हते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात कोहली शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी सुरंगा लकमलने त्याला माघारी धाडले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेत विराटला विश्रांती देण्यात आली होती. विश्रांतीनंतर विराटच्या भात्यातून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र पहिल्या डावात तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. अबू जायदने त्याला एका अप्रतिम इनस्विंगवर पायचित केले.

राहुल द्रविड 'लाभार्थी' नाही! हितसंबंधाच्या प्रकरणातून दोषमुक्त

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारताच्या पहिल्या डावातील ३० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पुजाराच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. पुजाराने ७२ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. त्यानंतर  ३२ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अबू जायदने विराटच्या रुपात भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला. पहिल्या दिवशी सलामीवीर रोहितला त्यानेच बाद केले होते. अबू जायद बांगलादेशकडून आतार्यंत यशस्वी गोंलदाज ठरला आहे.

दुती चंद 'टाइम 100 नेक्स्ट'च्या यादीत, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक