पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीसाठी मनापासून लिहिलेल्या विराटच्या 'त्या' पोस्टचाही अनोखा विक्रम

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह आणि सध्याच्या कर्णधार विराट कोहली यांच्यातील दोस्ती जगजाहीर आहे. धोनीच्या खांद्यावरील नेतृत्वाचा भार आपल्या खांद्यावर घेताना विराटने धोनीच आमचा सदैव कर्णधार राहिल असे वक्तव्य केले होते. मैदानावरही भारताचे दोन-दोन कर्णधार असल्याची चर्चाही रंगल्याचे आपण पाहिले. सध्याच्या घडीला चर्चा आहे ती धोनीच्या वाढदिवसादिवशी विराट कोहलीने केलेल्या खास ट्विटची. विराटने धोनीला ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा ट्विटने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. 

लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती

यंदाच्या वर्षातील ७ जुलैला धोनीला शुभेच्छा देण्यासाठी विराटने एक ट्विट केल होते. या ट्विटमध्ये त्याने लिहलं होत की, "माझा कर्णधार, वाढदिवसाच्या शुभेच्छा माही! फार कमी लोकांना विश्वास आणि आदर याचा अर्थ समजतो. तुझ्यासोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे ते मी माझे भाग्य समजतो. धोनी हा सर्वांसाठी भावासारखा असल्याचे सांगत माझ्यासाठी धोनीच सदैव कर्णधार राहिल" अशी पोस्ट कोहलीने केली होती.   

दुखण्यात खेळून हार्दिक पांड्यानं मोठी चूक केली

विराट कोहलीचे हे ट्विट क्रिकेट जगतात सर्वाधिक रिट्विट करण्यात आले आहे. माहीच्या बर्थडेला विराटने मनापासून केलेल्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला होता. हे ट्विट ४६.५ हजार वेळा  रिट्वीट करण्यात आले असून ४१३.४ हजार लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.