पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटकडून साक्षीचं तोंडभरुन कौतुक!

विराट कोहली आणि साक्षी चौधरी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड झालेल्या महिला बॉक्सर साक्षी चौधरीचे अभिनंदन केले आहे. कोहलीने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन तिच्या कामगिरीचे कौतुक केले. साक्षी चौधरीने ५७ किलो वजनी गटात ऑलिम्पिक पात्रता चाचणीत दोनवेळच्या रौप्य पदक विजेत्या सोनिया लाठेरला शह दिला. 

मेरी कोमनं प्रतिस्पर्धी झरीनला रिंगबाहेरही फटकारले

विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहलंय की, साक्षी अभिनंदन! तुझी कामगिरी खूप चांगली झाली. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तू स्वत:ला सिद्ध केले आहेस. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा! दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या लढतीत साक्षीने दमदार खेळ दाखवला. साक्षी विराट कोहली फाउंडेशनशी संलग्नित असणारी खेळाडू आहे. यापूर्वी युवा जागतिक सुवर्णपदक विजेत्या साक्षीने आपल्या वजनी गटात आशियाई रौप्य पदक विजेत्या मनिषा मौनचा ७-३ असा पराभव केला होता.  तर सोनिया लाथेरने सोनिया चहलला ७-३ पराभूत करुन अंतिम फेरी गाठली होती. 

... म्हणून BCCI च्या सिलेक्टरला या संघाच्या ड्रेसिंगरुममधून हाकलले

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आगामी वर्षातील फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये पार पडणार आहे. ५१ किलो, ५७ किलो, ६० किलो, ६९ किलो आणि ७५ किलो वजनी गटात कोणत्याही खेळाडूला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे या पाच गटासाठी ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणी घेण्यात आली. ५१ किलो वजन गटात मेरी कोमने निखत झरीनला पराभूत करत ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आपले स्थान पक्के केले होते. महिला बॉक्सिंगमधील ही लढत चांगलीच उत्सुकतेची ठरली. या लढतीपूर्वी निखत झरीनने राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या ऑलिम्पिक निवड प्रक्रियेसंदर्भात आक्षेप नोंदवला होता. मात्र अनुभवी मेरी कोमने झरीनला पराभूत करत तिच्या ऑलिम्पिकचा रस्ता बंद केला आहे.