भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कासोबत स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ही जोडी आपापल्या कामातून ब्रेक घेऊन परदेशात पोहचली आहे. स्वित्झर्लंडमध्ये रलैंड में विराट आणि अनुष्का यांची वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा यांची योगायोगाने भेट झाली. या भेटीचा क्षण अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. त्यानंतर आता विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे.
No stress about pictures when you’ve got the best photographer taking them for you 😃😍 @AnushkaSharma pic.twitter.com/uK3XO4dFhZ
— Virat Kohli (@imVkohli) December 31, 2019
हा फोटो जितका सुंदर आहे त्याहून कित्येकपटीने सुंदर असे कॅप्शनसह विराटने हा फोटो शेअर केलाय. उत्तम फोटोग्राफर तुमच्यासोबत असेल तर फोटो काढताना अधिक ताण येत नाही, अशा आशयाचे कॅप्शन देत त्याने आपला स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या अप्रतिम फोटोमागे अनुष्काचा हात असल्याचा उल्लेखही कोहलीने केलाय.
२२ डिसेंबरला भारतीय संघाने विंडीज विरुद्ध या वर्षातील अखेरचा सामना खेळला होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना जिंकत भारताने वर्षाचा शेवट गोड केला होता. नव्या वर्षात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कामगिरीत सातत्य ठेवेल अशी आशा आहे. ५ जानेवारीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेने भारतीय संघ नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
तत्पूर्वी विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत कॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. २०१९ हे वर्ष विराटसाठी फलदायी असे होते. यंदाच्या वर्षी इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील अर्धा तास आमच्यासाठी निराशजनक होता, असे खुद्द विराटने वर्षातील कामगिरीवर भाष्य करताना म्हटले होते. भारतीय संघाचा विश्वचषकातील सेमीफायनलमधील अर्ध्या तासाची कामगिरी सोडली तर यंदाचे वर्ष भारतीय संघाने कमालीची कामगिरी नोदंवली आहे.