पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफलातून खेळीदरम्यान श्रेयसची मज्जा, विराटलाही हसू आवरले नाही

श्रेयस अय्यर

India vs West Indies, 2nd ODI: सलामीवीर रोहित शर्मा (१५९) आणि लोकेश राहुल (१०२) धावांच्या जोरावर भारताने विंडीज विरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधली. या दोघांनी मजबूत सुरुवात करुन दिल्यानंतर मध्यफळीतील श्रेयस अय्यरने धमाकेदार खेळी करत विंडीजच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. अखेरच्या षटकात त्याने ऋषभ पंतच्या साथीने २४ चेंडूत ७२ धावांची दमदार भागीदारी केली. यासोबतच त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतत झळकावले. 

Video : कॅरेबियन पठ्ठ्याचा रोहितच्या खेळीला सलाम

मात्र, अर्धशतकाला एक धाव कमी असतानाच श्रेयस अय्यर सेलिब्रेशन करुन मोकळा झाला. ४८ व्या षटकात अय्यर-पंत ही दिल्लीकर जोडी मैदानात होती. कीमो पॉलच्या गोलंदाजीतील एका चेंडूवर एकेरी धाव घेत श्रेयसने बॅट उंचावली. अर्धशतक झाले असा त्याला वाटले. त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या दिशेने बॅट उंचावून दाखवली. त्यानंतर ड्रेसिंग रुममधून विराट त्याला इशारे करताना दिसला.

INDvsWI : कुलदीपची हॅटट्रिक! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

अर्धशतकाला आणखी एक धाव करायची आहे, असे इशारे ड्रेसिंगरुमधून करण्यात येत होते. श्रेयसला हे सांगत असताना ड्रेसिंगरुममध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. या गंमतीशीर घटनेनंतर अय्यरने आपले सहावे अर्धशतक झळकावले. ५३ धावा करुन तो तंबूत परतला. आपल्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार खेचले. यात त्याने चेसच्या षटकात ३१ धावा कुटत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Virat Kohli and team india hilarious reaction after Shreyas Iyer Celebrates his 50 on 49 runs watch funny video