पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय

अजिंक्य रहाणे

India vs Bangladesh 2nd Test at Kolkata Eden Gardens: भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा एक एतिहासिक क्षण असणार आहे. कारण पहिल्यांदाच हे दोन्ही संघ डे नाइट कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाचा हा ५४० वा सामना आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसह संघातील खेळाडू देखील या सामन्यासाठी उत्सुक आहेत. 

T20 : 'अभय' खेळीनं नेगीची लोकेशच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला तर पिंक बॉलची स्वप्ने पडू लागले आहेत. अजिंक्य रहाणेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो गुलाबी रंगाच्या चेंडू जवळ ठेवून झोपल्याचे दिसत आहे. अंजिक्य रहाणेच्या या पोस्टवर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. चांगली पोझ आहे, असे विराटने लिहिले आहे. तर धवनने 'सपने में तस्वीर खिंच गई।' असे म्हटले आहे. धवनला रिप्लाय देताना अजिंक्यनं लिहिलंय की 'सपनों में नहीं, अपनों ने पिक खींची है।  

IPL 2020: ..तर स्टेन'गन' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल

भारत-बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक सामन्यासाठी स्टेडियमलाही गुलाबी-गुलाबी रंगाने सजवण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिला दिवस-रात्र कसोटी सामना अविस्मरणीय ठरावा यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली स्वत: तयारीवर लक्ष ठेवून आहेत.  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Already dreaming about the historic pink ball test 😊

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on