India vs South Africa, 1st T20 at Dharamshala: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरोधात १५ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसह तीन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे. धर्मशालामध्ये पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. कोहली आणि रोहितची नजर या सामन्यातील काही खास विक्रमांवर नजर आहे.
INDvsSA Test: विराटचा 'लाडला' बाहेर! रोहित शर्मा संघात
रोहित शर्मा हा टी-२० मध्ये सर्वांधिक धावा बनवणारा खेळाडू आहे. विराट कोहली त्याच्यापेक्षा अवघ्या ५३ धावा दूर आहे. रोहितने ८८ डावांत २४२२ धावा तर कोहलीने ६५ डावांमध्ये २३६९ धावा केल्या आहेत.
टी-२० मध्ये सर्वांधिक धावा करणारे खेळाडू
२४२२- रोहित शर्मा (भारत)
२३६९- विराट कोहली (भारत)
२२८३- मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)
२२६३- शोएब मलिक (पाकिस्तान)
२१४०- बँडन मॅक्युलम (न्यूझीलंड)
रोहित आणि कोहलीची नजर इतर विक्रमांवरही असेल. क्रिकेटच्या या सर्वांत छोट्या प्रकारात रोहित आणि कोहली दोघांचीही ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्यामध्ये बरोबरी आहे. रोहितने १७ अर्धशतके आणि ४ शतके ठोकली आहेत. तर कोहलीने टी-२० मध्ये २१ अर्धशतके ठोकली आहेत. पण दुसरीकडे वास्तव हे आहे की, घरच्या मैदानावर टी-२० मध्ये भारताने एकदाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेले नाही.
धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार- निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद
मागील वेळी २०१५ मध्ये भारताने घरच्या मैदानावर झालेल्या द्विपक्षीय मालिकेत आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव स्वीकारला होता. एक सामना रद्द झाला होता. भारतात दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ६६.६७ टक्के आहे. त्यांनी ६ पैकी ४ सामने जिंकले आहेत.