पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Pune Test : जाळीतील सरावात विराट सापडला जडेजाच्या जाळ्यात

विराटने जडेजाच्या गोलंदाजीवर सराव केला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या कसोटी विजयासाठी सज्ज आहे. पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने नेटमध्ये अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर कसून सराव केला. यावेळी जडेजाने कर्णधारचा त्रिफळा उडवल्याचे पाहायला मिळाले.

INDvSA: दुसरी कसोटी पुण्यात, पण पाण्यात तर नाही ना जाणार?

भारतीय संघाचा कर्णधार एकदिवसीय आणि टी-२० मध्ये दमदार कामगिरी करताना दिसते. मात्र कसोटी कारकिर्दीमध्ये तो फारसा प्रभावी ठरलेला नाही. यंदाच्या वर्षात कसोटीमध्ये विराटच्या भात्यातून धमाका पाहायला मिळालेला नाही. चार कसोटी सामन्यात कोहलीने ३५ च्या सरासरीने अवघ्या २१० धावा केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीतील त्याची ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांक कामगिरी आहे.  

धोनी मैदानात उतरण्याचं ठरलं, पण...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकत भारताने विश्व टेस्ट चँम्पियनशिपमध्ये १६० अव्वलस्थान मिळवले आहे. पुण्यातील विजयासह विराट सेना आपले स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. याशिवाय विराट कोहलीसमोर आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची कसोटी असेल. भारतीय संघासह विराट यशस्वी होणार का हे पाहण्यासाठी पावसाने उंसत घेण्याचीही गरज आहे. पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस दुसऱ्या कसोटीवर पाणी फेरु शकतो.