पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट कोहलीनं व्यक्त केली किल्ले रायगडावर जाण्याची इच्छा

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीचा योग जुळून आला. या गाठीभेटीत घडलेल्या अनौपचारिक गप्पा गोष्टींमध्ये विराटनं किल्ले रायगडावर जाण्याची इच्छा  व्यक्त केल्याचं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. 

'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं! सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक

तीन दिवसांपूर्वी ही भेट घडली. या भेटीनंतर विराटनं रायगडावर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी ही भेट घडवून आणली. आमच्या भेटीआधी जतीननी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल कदाचित त्यामुळे, विराटनी स्वतःहून  रायगड किल्ल्यावर येण्याची ईच्छा व्यक्त केली.' असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार