पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांगुलीच मत कांबळीला खटकलं

विनोद कांबळी

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने निवड समितीला सुनावलेला सल्ला माजी क्रिकेटर विनोद कांबळीला पटलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या खेळाडूंची निवड करण्यापेक्षा एकाच खेळाडूला टी-२०, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये खेळवण्याची वेळ आली आहे, असे गांगुलीने निवड समितीला उद्देशून म्हटले होते. 

अजिंक्य, शुभमन वनडे संघात का नाहीत? गांगुलीचा निवड समितीला सवाल ़

गांगुलीने व्यक्त केलेल्या मतावर  विनोद कांबळीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीच्या ट्विटर प्रतिक्रिया देताना कांबळीनं लिहलंय की, "मला वाटतं की जो खेळाडू ज्या प्रकारात चांगला खेळतो त्याच प्रकारात त्याला संधी द्यावी. यामुळे खेळाडूंवर ताण येणार नाही. याचा संघाला फायदाच होईल" 

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडीबाबत गांगुलीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कसोटी संघात घेतलेल्या अजिंक्य रहाणेला वनडेत स्थान का नाही? तसेच शुभमन गीलला संधी का दिली नाही? असे प्रश्न गांगुलीने उपस्थित केले होते. याशिवाय खेळाडूंप्रमाणे निवड समितीनेही आपल्या निर्णयामध्ये सातत्य राखावे असा टोलाही त्याने निवड समितीला लगावला होता.