पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'खेल'रत्नसाठी विनेश, बजरंग तर राहुलची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

विनेश फोगट

देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या नावाची शिफारस केली आहे. मागील वर्षी इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगटने सुवर्ण पदकाची कमाई करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती. आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिला महिला कुस्तीपटू आहे. याशिवाय तिने  २०१४ मध्ये ग्लासगो (४८ किलो वजनी गट)आणि २०१८ मध्ये गोल्ड कोस्टमध्ये (५० किलो वजनी गट) झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकांची कमाई करुन दिली होती.

पुरुष गटात मागील वर्षी बजरंग पुनियाने कमालीची कामगिरी केली होती. जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत आणि  गोल्डकोस्टमध्ये रंगलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुनियाने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. या कामगिरीच्या जोरावर तो जागतिक कुस्ती क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचणारा पुनिया पहिला भारतीय कुस्तीपटू आहे. २०१५ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

या दोन कुस्तीपटूंशिवाय भारतीय कुस्तीमहासंघाने महाराष्ट्राचा मल्ल राहुल अवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पुजा धांडा यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तर कुस्तीच्या मैदानात खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या विरेंदर कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची दोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vinesh Phogat and Bajrang Punia recommended for Khel Ratna And Rahul Aware for Arjuna Award by Wrestling Federation of India