पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विजय हजारे ट्रॉफी: चौकार-षटकारवाले दोन संघ फायनलमध्ये

लोकेश राहुल

Vijay Hazare Trophy 2019: देवदत्त पड्डीकल (९२) आणि लोकेश राहुल (नाबाद ८८) धावांच्या जोरावर विजय हजारे चषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाने घरच्या मैदानावर छत्तीसगडला ९ गडी राखून पराभूत केले. या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूने गुजरातला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी गुजरातला पाच गडी राखून पराभूत केले. तामिळनाडूचा संघ सहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. 

बांगलादेशचा संघ यईल! गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला

कनार्टकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत प्रतिस्पर्धी छत्तीसगडला ४९.४ षटकात २२३ धावांवर आटोपले. छत्तीसगडकडून अमनदीप खरे याने १०२ चेंडूत ७८ धावांची सर्वाधिक धावसंख्या रचली. धावांचा पाठलाग करताना पड्डीकलने ९८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ९२ धावा केल्या. लोकेश राहुल (८८) आणि मंयकने (४७) धावांची नाबाद खेळी करत कर्नाटकला अंतिम फेरीतील मार्ग सुकर केला.

ICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम

कर्नाटकने दिलेल्या २२४ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि पड्डीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ३०.५ षटकात १५५ धावांची भागीदारी रचली. पड्डीकल बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने मंयक अग्रवालच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. गोलंदाजीमध्ये कर्नाटककडून व्ही. कौशिकने सर्वाधिक चार तर अभिमन्यू मितून, कृष्णप्पा गौतम आणि प्रविण दुबे यांनी प्रत्येकी दोन-दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.