पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Awards 2019 : रोहित शर्मा ठरला 'ODI Cricketer of the Year'

रोहित शर्मा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०१९ वर्षांतील पुरस्कारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत उत्तम कामगीरी बजावणाऱ्या इंग्लडच्या अष्टपैलू खेडाळू  बेन स्टोक्सला 'वर्ल्ड प्लेअर ऑफ द इअर' पुरस्कार जाहीर झाला आहे. बेननं न्यूझीलंडविरोधातील अंतिम सामन्यात नाबाद ८४ धावा केल्या होत्या.  २० एकदिवसीय मालिकांत बेननं एकूण ७१९ धावा केल्या, तर १२ झेल घेतले.

सामन्यानंतर विराट म्हणाला मी चुकलो!

 ''हा नक्कीच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे गेल्यावर्षी इंग्लडच्या  संघानं खूप चांगली कामगिरी केली'', असं बेन म्हणाला.  भारतीय संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यातील 'प्लेअर ऑफ द इअर' पुरस्कारानं सान्मानित करण्यात आलं आहे. २०१९ या वर्षांत भारतीय संघानं चांगली कामगीरी केली. ' नव्या वर्षांबाबतही आम्ही सकारात्मक आहोत. बीसीसीआयनं मला भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी दिली ही माझ्यासाठी नक्कीच मोठी बाब आहे'', अशा शब्दात रोहितनं आपला आनंद व्यक्त केला.

तर भारताचा युवा खेळाडू दीपक चहरला २०१९ मधल्या टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगीरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली याची 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' (spirit of cricket) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

वर्णभेदीच्या टिप्पणीमुळे क्रिकेट चाहत्यावर कारवाई