पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवड समितीच्या २ रिक्तपदासाठी ४४ अर्ज, अंतिम ५ मध्ये या मंडळींची वर्णी

व्यंकटेश प्रसाद आणि अजित आगरकर

भारतीय संघाचे माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि फिरकीपटू सुनील जोशी ही जोडगोळी भारतीय निवड समितीच्या रिक्तपदाच्या जागेच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने ज्या पाच लोकांना बुधवारी मुलाखतीसाठी बोलवले आहे त्यामध्ये या दोघांचा समावेश आहे. याशिवाय लक्ष्मण शिवरामाकृष्णन, राजेश चौहान आणि माजी गोलंदाज हरविंद्र सिंह ही मंडळींचा यात समावेश आहे. 

सोळावं वरीस मोक्याचं! शेफालीनं तोऱ्यात गाठलं अव्वलस्थान

माजी क्रिकेटर मदनलाल, आर पी सिंह आणि सुलक्षणा नाईक या माजी क्रिकेटर्सचा बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये समावेश असून ही मंडळी भारताच्या क्रिकेट मंडळाच्या निवड समितीच्या रिक्त जागेवर कोणाला संधी देणार याचा निवाडा करणार आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीचे मावळते अध्यक्ष एएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांची जागा रिक्त होणार असून या दोन जागेसाठी पाच उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे.  

आयपीएलवर आर्थिक संकट: विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसमध्ये कपात

भारतीय निवड समितीच्या रिक्त होणाऱ्या दोन पदासाठी एकूण ४४ अर्ज दाखल झाले होते. यात माजी गोलंदाज अजित आगरकर यांच्या नावाचाही समावेश होता. अजित आगरकर यांना प्रमुख दावेदार मानण्यात येत होते. मात्र अंतिम पाच जणांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. माजी यष्टिरक्षक नयन मोंगिया यांनीही निवड समितीच्या रिक्त पदासाठी अर्ज केला होता. आगरकर यांच्या नावाकडे दुर्लक्ष करणे याचा अर्थ राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सदस्यांची निवडही क्षेत्रानुसारच होणार असल्याचे संकेत मिळतात. जर ही रणनिती असेल तर पंजाब आणि रेल्वेचे प्रतिनिधीत्व केलेल्या हरविंदर सिंह यांची मध्य क्षेत्रातून रिक्त होणाऱ्या पदी असलेल्या  खोडा यांच्या जागी नियुक्ती होऊ शकते. तर दक्षिण क्षेत्रातून प्रसाद आणि जोशी या दोन नावांचा विचार केला जाऊ शकतो.