पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनने दिला पहिल्या प्रेमाच्या आठवणीला उजाळा

सचिन तेंडुलकर

जगभरात आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. तरुणाईसाठी पर्वणीचा असलेल्या प्रेमाच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. 'माझं पहिलं प्रेम'  असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. क्रिकेट हेच माझ पहिलं प्रेम आहे असेच सचिनला या व्हिडिओतून सांगायचे आहे.  

NZvsIND: टीम इंडियाचा सराव धाकधूक वाढविणारा...

१६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या चाळीसीपर्यंत क्रिकेटच्या मैदान गाजवले.  २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो क्रिकेटशी संलग्नितच असल्याचे पाहायला मिळते.  सचिन तेंडुलकरने जो व्हिडिओ शेअर केला आहे तो ऑस्ट्रेलियातील चॅरिटी सामन्यापूर्वीच्या सरावादरम्यानचा आहे.

...अन् दादाने घेतली मास्टर ब्लास्टरची फिरकी

ऑस्ट्रेलियातील जंगलातील अग्नीतांडवामुळे प्रभावित झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. रिकी पॉन्टिंग विरुद्ध गिलख्रिस्ट इलेव्हन असा सामना काही दिवसांपूर्वी खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये सचिनने ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाजांचा सामना केल्याचे पाहायला मिळाले होते. जवळपास सहा वर्षानंतर सहा चेंडू खेळण्यासाठी सचिनने तब्बल ४० मिनिटांपेक्षा अधिक काळ सराव केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:valentines day 2020 sachin tendulkar reveals his first love anjali tendulkar watch cricket viral video