चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेला हैराण करुन सोडले आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दहा लाखाहून अधिक झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढत्या आकड्यासंदर्भात सारवासारव केली आहे. जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनासंदर्भात अनेक लोकांची तपासणी केली जात आहे. अधिक चाचणी होत असल्यामुळे अमेरिकेतील आकडा मोठ्या प्रमाणात दिसतोय, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
व्हाइट हाऊसनं पंतप्रधान मोदींना केलं अनफॉलो
ट्रम्प यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, इतर राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक लोकांची कोरोना विषाणूसंदर्भातील तपासणी करण्यात येत आहे. या एकमेव कारणामुळे अमेरिकेतील आकडा हा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अन्य राष्ट्र टेस्टिंगमध्ये अमेरिकेपेक्षा मागे आहेत. या राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अमेरिकेपेक्षा कमी नोंदवला जात आहे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.
अष्टपैलू अभिनयासाठी इरफान खान कायम स्मरणात राहतील - मोदी
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा अमेरिकेतील आकडा हा थक्क करुन टाकणारा आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत एक लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. याठिकाणी आतापर्यंत ५८ हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.