अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी 'नमस्ते ट्रम्प' या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. भारतीयांच्या क्षमतेवर भाष्य करताना ट्रम्प यांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
'नमस्ते ट्रम्प': भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु- PM मोदी
आपल्या भाषणात ट्रम्प म्हणाले की, आपल्या भाषणात ट्रम्प म्हणाले की, तुमच्याकडे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे महान क्रिकेट आहेत. ज्यावेळी ट्रम्प यांनी दिग्गज क्रिकेटर्सचे नाव घेतले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटोरा स्टेडियमवर लाखोच्या संख्येने लोक जमले होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक
मोटोरा स्टेडियमवरील भव्यदिव्य कार्यक्रमाला ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि अमेरिक्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प, त्यांची मुलगी इवांका आणि जावई जरेद हे देखील उपस्थितीत होते. नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाच्या समारोहाच्या भाषणात बीसीसीआयचे आभार मानले. भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांच्या भव्य दिव्य स्वागतासाठी हे स्थळ उपलब्ध करुन दिले, त्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असे मोदी म्हटले आहे.