पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबतचा 'फैसला' जूनमध्ये होणार!

अमेरिकन ओपन स्पर्धेदरम्यानचे संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूने जगभरात घातलेल्या थैमानामुळे अनेक खेळ स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की विविध खेळ प्रकारातील आयोजकांवर ओढावली. ऑलिम्पिकसारखी मानाची स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ विम्बल्डन ही टेनिसच्या कोर्टवरली ग्रँडस्लम स्पर्धा दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रद्द करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. त्यानंतर आता अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं काय होणार असा प्रश्न टेनिस चाहत्यांना पडला आहे. 

'IPL साठी PCB आशिया चषक रद्द करण्यास 'राजी' होणार नाही'

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा नियोजित वेळेत खेळवण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. या स्पर्धेची तयारी सुरु आहे. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवण्याबाबत कोणताही विचार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकी टेनिस महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक डाउस यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेबाबत अंतिम निर्णय हा जूनमध्ये घेण्यात येईल.    
चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने संक्रमित झालेल्या कोरोना विषाणूचा अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये १० हजार ८०० पेक्षा अधिक लोकांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. संपूर्ण अमेरिकेचा विचार केला तर देशात आतापर्यंत जवळपास ६ लाख ४०,०००  लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३१ हजारहून अधिक लोकांचा कोरोना जीव घेतला आहे.    

जुने सामने पाहून कंटाळलोय! खेळ पुन्हा सुरु करायला हवा : ट्रम्प

कोरोनाचा मोठा फटका बसला असताना खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील खेळ लवकर सुरु करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते. जुने सामने पाहून कंटाळलो आहे. खेळ पुन्हा सुरु करायला हवेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. जागतिक संकटाचा सामना करत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि यूएस ओपनच्या आयोजकांनी दाखवलेल्या सकारात्मकतेचा विजय होणार की कोरोनामुळे या स्पर्धेवरही संकट ओढावणार हे येणारा काळच ठरवेल.