पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US Open 2019: नदालच चॅम्पियन, मेदवेदेवचा पराभव करत १९ वा ग्रँडस्लॅम पटकावला

नदालच चॅम्पियन, मेदवेदेवचा पराभव करत १९ वा ग्रँडस्लॅम पटकावला

स्पॅनिश स्टार राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा चुरशीच्या सामन्यात पराभव करत यूएस ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. सुमारे ५ तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव करत १९ वा ग्रँडस्लॅम पटकावला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नदालला पाचव्या नामांकित डॅनिल मेदवेदेववर अत्यंत संघर्षपूर्ण विजय मिळवला. 

हा किताब पटकावल्यानंतर रॉजर फेडररच्या पुरुषांच्या विक्रमापासून तो अवघ्या एका ट्रॉफीपासून दूर आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करताना नदालने १२ वा फ्रेंच ओपन किताब पटकावला होता आणि आता अमेरिकन ओपनचे चौथे विजेतेपद त्याने आपल्या नावे केले आहे.  

नदाल आता फेडरर, पीट सम्प्रास आणि जिमी कोनोर्सच्या अमेरिकन ओपनच्या विक्रमापासून अवघ्या एका किताबापासून दूर आहे. त्यांनी ५ अमेरिकन ओपन किताब आपल्या नावे केले आहेत. 

मेदवेदेव २३ व्या वर्षी पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत पोहोचला होता आणि मागील सहा आठवड्यापासून तो जबरदस्त खेळत होता. यामध्ये त्याने वॉश्गिंटन आणि कॅनडामध्ये उपविजेतेपदानंतर त्याने सिनसिनाटी स्पर्धेचे जेतेपद आणि आता अमेरिकन ओपनमध्ये अंतिम सामन्यापर्यंत तो पोहोचला. 

मरात साफिनने २००५ ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर पुरुष ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिलाच रशियन खेळाडू ठरला आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:US Open 2019 Final Rafael Nadal Beats Daniil Medvedev In Marathon Final To Claim 19th Grand Slam Title