पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US OPEN 2019: असह्य वेदनेमुळे जोकोविचला सोडावे लागले मैदान

नोव्हाक जोकोविच

टेनिसमधील जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या आणि अमेरिकन ओपनचा गत विजेता नोव्हाक जोकोविचचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान  संपुष्टात आले. चौथ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टान वावरिंका याच्यासोबतच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

US OPEN 2019: सेरेना-एलिनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

दोघांच्यामध्ये रंगतदार सामना सुरु असताना खांद्याच्या दुखापतीच्या वेदना असह्य झाल्यानंतर जोकोविचने सामना अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. दुखापतीनंतरही त्याने दोन सेट होईपर्यंत मैदानात थांबला. यावेळी वावरिंका ६-४, ७-५ अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सेटमध्येसुद्धा त्यानं आघाडी कायम ठेवली होती.  

IND vs WI: बुमराहच्या बाउन्सरवर डॅरेन ब्रावो 'रिटायरहर्ट'

जोकोविचने मैदान सोडल्यानंतर वावरिंका पुढच्या फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाच्या हुआन लॉनेडरोविरुद्धच्या सामन्यातही तो खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त होता. त्यानंतर त्यानं जोरदार पुनरागमन केले होते. शनिवारी त्याने अमेरिकेच्या   डेनिस कुडला  सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम उप उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.