पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

US OPEN 2019: जोकोविच-फेडररची आगेकूच

जोकोविच-फेडरर

टेनिस जगतातील अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा  नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी यावर्षीच्या अमेरिकन ओपनच्या अंतिम १६ मध्ये आपले स्थान पक्के केले. पहिल्या दोन फेरीत पहिला सेट गमावल्यानंतर तिसऱ्या फेरीत रॉजर फेडररने आक्रमक खेळ दाखवला. तिसऱ्या फेरीतील १ तास २० मिनिटे चाललेल्या सामन्यात त्याने ब्रिटनच्या डेनियल इवांसला ६-२,६-२,६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. उप उपांत्यफेरीत फेडररचा सामना बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनविरुद्ध होणार आहे.  

धोनीची निवड का झाली नाही, एमएसके प्रसाद यांनीच सांगितलं कारण

पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात अव्वलस्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या डेनिस कुडला याला ६-३,६-४,६-२ असे पराभूत करत आगेकूच केली. जोकिवचचा पुढील सामना जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या वावरिंका याच्यासोबत होणार आहे. वावरिंकाने २०१६ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल यात शंका नाही.    

अंबाती रायडूचा यू-टर्न, निवृत्तीचा निर्णय मागे

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या जोडीदारासह यंदाची ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बोपण्णा कॅनडाचा जोडीदार डेनिस शापोवालोवसोबत फ्रान्सच्या पिएरे हुगेस हर्बट आमि नोकोलस महूत यांच्याविरुद्ध मैदानात उतरेल. पेस अर्जेंटीनाचा जोडीदार गुलीरेमो दुर्रानसोबत सर्बियाचा के मिमोमीर केसमानोविच आणि नार्वेच्या कॅस्पर रूडला आव्हान देईल.