पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती मानधना अन् रोहन बोपण्णा अर्जुन पुरस्काराने सन्मानित

केंद्रीय क्रिडा मंत्री आणि क्रिकेटर स्मृती मानधना

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना मंगळवारी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रिडा आणि युवा मंत्री  किरण रिजिजू यांनी या दोन्ही खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान केला. 

उल्लेखनिय आहे की, २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या पुरस्कारावेळी हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने परदेशात होते. स्मृती मानधना म्हणाली की, "हा पुरस्कार ८ -१० महिन्यापूर्वी घोषीत करण्यात आला होता. तेव्हापासून मी उत्साहित होते. मेहनतीचे फळ या पुरस्काराच्या रुपानं मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. यापुढेही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन" स्मृतीने २०१८ मध्ये १२ एकदिवसीय सामन्यात ६६९ आणि २५ टी-२० सामन्यात ६२२ धावा केल्या आहेत. 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशियाई गेम्स २०१८ मध्ये टेनिस पुरुष दुहेरीतील सुवर्ण पदक विजेता बोपन्ना म्हणाला की, "अर्जून पुरस्काराने सन्मानित होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यान मला खूप आनंद झाला आहे."  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Union Sports Minister Kiren Rijiju conferred Arjuna Awards to cricketer Smriti Mandhana and tennis player Rohan Bopanna