पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019 : फक्त भाजपचे नेतेच गुणगाण गाताहेत : अखिलेश यादव

अखिलेश यादव

समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्प निर्थक असल्याचा टोला लगावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गरिबांसाठी, युवांसाठी आणि नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. एकाच्या हातून हिसकावून घेत दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया अर्थसंकल्पात दिसते. केवळ भाजप नेते अर्थसंकल्पाचे कौतुक करत आहेत. त्यांना सर्व काही चांगल दिसत असले तरी सत्य लपत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

अर्थसंकल्पात १० वर्षांचे 'व्हिजन': निर्मला सीतारामन

अखिलेश यादव म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अधिभारामुळे परिवहन महाग होईल. जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील वाढतील. त्यामुळे सामान्य कुटुंबियांचे अर्थकारण कोलमडेल. शेतकरी डिझेलचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. त्यांना आर्थिक फटका बसेल. 

 

Budget 2019: कराचा भार वाढवणारा अर्थसंकल्प, पी. चिदंबरम यांची टीका

युवांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने स्टार्टअप, मुद्रा कर्ज जुन्याच योजना नव्याने सादर केल्या गेल्या. युवकांसाठी कोणतीही खास योजनेची तरतूद सरकारने केलेली नाही. विदेशी पुस्तकांचे महाग करुन शोध-प्रबंध शिक्षणावर परिणाम होईल. भाजपने आपल्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधीत काहीच केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आश्वासने पूर्ती करण्याची आशाही नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर तोफ डागली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Union Budget 2019 akhilesh said nothing in the budget for the poor the youth and the job seekers