दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान चेंडू फेकल्याच्या कारणामुळे श्रीलंकेचा गोलंदाज चर्चेत आला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजाने 175 km/h गतीने चेंडू फेकत पाकिस्तान जलदगती गोलंदाज आणि रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरचा विक्रम मोडल्याची चर्चा जोरदार रंगली. मात्र मशिनमध्ये बिघाड असल्याचे समोर आल्यानंतर अख्तरचा विक्रम अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ९० धावांनी पराभूत केले होते. या सामन्यानंतर माथिसा हा चर्चेत आला होता.
शुभमन गिलच्या संघाचा विजय विराट सेनेसाठी शुभ संकेत देणारा
श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज माथिसा याने भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल याला फेकलेला चेंडू 175 km/h गतीने फेकला गेल्याची नोंद झाली होती. हा चेंडू व्हाइड होता. पण सर्वात गतीने चेंडू फेकण्याचा पराक्रम माथिसाने केल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण मशिनमधील खराबीमुळे चेंडूची गती चुकीची नोंद झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वाधिक वेगवान चेंडू फेकण्याचा अख्तरचा विक्रम कायम असल्याचे समोर आले.
...म्हणून अनिल कुंबळेंनी मानले PM मोदींचे आभार
क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम हा पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावे आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने न्यूलँडच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 161.3km/h गतीने चेंडू फेकण्याचा विक्रम नोंदवला होता. त्याचा हा विक्रम अद्यापही अबाधित असाच आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉन टेट आणि ब्रेट ली अख्तरच्या विक्रमाच्या जवळ पोहचले होते. पण त्यांना देखी हा विक्रम मोडता आला नव्हता.