दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, मंगळवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्टस या वाहिनीशिवाय हॉटस्टारवर देखील लाइव्ह स्ट्रेमिंगसह क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल. हिंदुस्थान टाइम्स मराठी https://marathi.hindustantimes.com/ या आपल्या साईटवर देखील तुम्ही सामन्याच्या अपडेट्स क्षणात मिळवू शकता.
NZvsIND: जखमी रोहितच्या जागी या दोघांनी मिळणार संधी
युवा भारतीय संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये में ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. तर पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानला नमवत सेमी फायनलचे तिकीट मिळवले होते. १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा भारी राहिला आहे. पण आतापर्यंत विश्वचषकात रंगलेल्या सामन्यात भारत पाकपेक्षा ४-५ अशा फरकाने पिछाडीवर आहे. सध्याच्या युवा भारतीय संघाला हे रेकॉर्ड बरोबरीत करून फायनलमध्ये धडक मारण्याची संधी आहे.
Video: धोनीच्या फिरकीवर साक्षीचा कडक स्ट्रेट ड्राईव्ह
या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना हा ६ फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात रंगणार असून ९ फेब्रुवारीला फायनलमध्ये कोणत्या दोन संघात सामना रंगणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. युवा भारतीय संघाने आतापर्यंत चारवेळा विश्वचषक उंचावला असून पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.