पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Under-19 World Cup : स्पर्धेत निच्चांकी धावसंख्येसह लाजिरवाणा विक्रम

युवा टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत युवा टीम इंडियाने १० गडी राखून जपानचा धुव्वा उडवलाय. नाणेफेक जिंकून युवा टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फंलदाजी करणाऱ्या जपानला युवा गोलंदाजांनी २२. ५ षटकात अवघ्या ४१ धावांत गारद केले. हे अल्प आव्हान युवा टीम इंडियाच्या सलामीवीरांनी पाचव्या षटकात पार केले.  

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

युवा टीम इंडियाकडून  यशस्वी जयस्वालने १८ चेंडूत नाबाद २९ तर कुमार कुशाग्रने ११ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या. यंदाचा १९ वर्षांखालील विश्वचषक हा दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत युवा टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात जपानच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील जपानने नोंदवलेली धावसंख्या ही निच्चांकी आहे.  

INDvNZ: खंदा फलंदाज खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार

युवा टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने ८ षठकात तीन निर्धाव षटकासह ५ धावा खर्च करुन ४ बळी टिपले. भारतीय गोलंदाजांनी जपानची अवस्था इतकी केवलवाणी केली होती की संघातील पाच खेळाडूंना आपले खातेही उघडता आले नाही. जपानकडून शू नोगुची आणि केंटो ओटा डोबेल यांनी प्रत्येकी ७-७ धावा केल्या. त्यांच्या संघाकडून ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली. याव्यतिरिक्त मॅक्स क्लेमेंट्सने ५ धावा केल्या,  कर्णधार मार्कस थुरगाटे अवघ्या एका धावेवर बाद झाला.  

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

जपानच्या फलंदाजांनी केलेल्या धावांपेक्षाही अधिक धावा या अवांतरच्या होत्या. त्यांना १२ व्हाइडसह जपानला १९ अवांतर धावा मिळाल्या. युवा टीम इंडियातील कार्तिक त्यागीने ६ षटकात १० धावा खर्च करुन ३ बळी टिपले. आकाश सिंहने २ तर विद्याधर पाटील याला १ बळी मिळाला. यापूर्वी युवा टीम इंडियाने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला ९० धावांनी पराभूत केले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Under 19 World Cup 2020 India U19 vs Japan U19 India under 19 team won by 10 wickets japan under 19 team got all out on 41 joint second lowest score in the history of the Under 19 World Cup