पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WI vs IND, Video : मंयकच्या फलंदाजीवेळी निर्णयात झोल, अंपायर ट्रोल

मयंक अग्रवालने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली

क्रिकेटच्या मैदानात डीआरएस सारख्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर होत असताना देखील बऱ्याचशा सामन्यात पंच वादात आपल्या वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत येण्याचे चित्र भारत-विंडीज कसोटी दरम्यानही पाहायला मिळाले. जमैकाच्या मैदानात कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीज कर्णधार जेसन होल्डरने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.  
मात्र सामन्यादरम्यान पुन्हा एकदा पंचाच्या बोगस कारभाराचे दर्शन पाहायला मिळाले.

WI vs IND 2nd Test; DAY-1: ऋषभ पंत-हनुमा विहारीने सावरला डाव

पहिल्या दिवशीच्या खेळात अर्धशतकी भागीदारी करुन भारताचा डाव सावरणाऱ्या सलामीवीर मयंक अग्रवालला पंचानी चुकीच्या पद्धतीने बाद दिले. स्वत:ला असलेला आत्मविश्वासाच्या जोरावर चेंडू बॅटची कड घेतली नसल्याचे सांगत मयंकने रिव्ह्यू प्रणालीचा उपयोग करत आपली विकेट वाचवली. जर मयंकने रिव्ह्यू घेतला नसता तर भारताला नाहक विकेट गमवावी लागली असती. या निर्णयामुळे मैदानातील पंचाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून सोशल मीडियावर पंचाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

 

US OPEN 2019: जोकोविच-फेडररची आगेकूच

सबीना पार्कवर सुरु असलेल्या सामन्यातील पंच रिचर्ड कॅटीब्राफ यांनी मयांकला झेल बाद दिले. डीआरएसमध्ये पंचांचा निर्णय चुकीचा ठरला. आणि मयंकला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. मयंकने या संधीच सोनं करत ७ चौकाराच्या मदतीने त्याने  ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराट कोहलीसोबत त्याने केलेली ६९ धावांची भागीदारीने भारतीय संघ सुस्थितीत आहे. यात कोहलीच्या ७६ धावांचा समावेश आहे.