पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्या क्षमतेचा योग्य वापर केला नाही, उमेशचा निवड समितीला 'बाऊन्सर'

उमेश यादव

वर्षभरापेक्षाही अधिक काळ भारतीय वनडे आणि टी-२० संघातून बाहेर असलेल्या जलदगती गोलंदाज उमेश यादवने मनातील खदखद व्यक्त केली आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत 18 बळी मिळवून सुद्धा एकदिवसीय आणि टी-२० संघात त्याला संधी देण्याबाबात विचार झाला नाही. २०१८ मध्ये उमेश यादवने वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. तर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला टी-२० मध्ये संधी मिळाली होती.  

कोरोनाविरोधात लढा : रोहित शर्माकडून महाराष्ट्रासाठी २५ लाखांची मदत

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजण्यापलीकडचा असल्याचे मत उमेश यादवने म्हटले आहे. चेंडू पांढरा असला किंवा लाल असला तरी स्विंग करण्याची क्षमता बदलत नाही. जर मला वनडेमध्ये संधी मिळाली तर आजही मी विकेट टेकरची भूमिका पार पाडण्यात सक्षम आहे, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. निवड समितीने वनडेसाठी माझा योग्य वापर केला नाही, अशी खंतही त्याने बोलून दाखवली. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू

विदर्भाचा हा जलदगती गोलंदाज भारतीय संघात सातत्यपूर्ण संधीस मुकला आहे. नेहमी तो संघातून आत-बाहेर अशीच कसरत करताना दिसले. यावर तो म्हणाला की, जर संघातील स्थान अस्थिर असेल तर त्याचा तुमच्या गोलंदाजीवर परिणाम होता. एक सामन्यात संधी दिल्यानंतर सहा महिने तुम्ही संघाबाहेर असाल तर तुमच्या गोलंदाजीतील प्रभावी मारा नाहीसा होता. तो पुढे म्हणाला की, सध्याच्या घडीला माझ्याकडे कसोटी गोलंदाज म्हणून पाहिले जात आहे. पण या प्रकारतही सातत्यपूर्ण संधी मिळत नाही, ही शोंकातिकाही त्याने बोलून दाखवली. कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे सध्या खेळाच्या मैदानात ६  कसोटी ७५ वनडे आणि ७ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून कसोटीत त्याने १४४ बळी टिपले आहेत तर वनडेत १०६ आणि टी-२० मध्ये ९ बळी त्याच्या खात्यात जमा आहेत.