पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लंडच्या 'द क्रिकेटर' मासिकातही विराट ठरला या दशकातील राजा

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मागील एका दशकात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीची इंग्लंडमधील प्रसिद्ध 'द क्रिकेटरट' या मासिकाने दखल घेतली आहे. दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून मासिकाने विराटला पंसती दिली आहे. त्यांनी निवडलेल्या आघाडीच्या दहामध्ये क्रिकेटर्समध्ये रोहित शर्मा आणि धोनीला स्थान मिळालेले नाही. 

Wisden Test team of the Decade: भारताच्या केवळ दोघांचाच समावेश

मासिकाने दशकातील कामगिरीच्या जोरावर निवडलेल्या खेळाडूंमध्ये एकूण ५० खेळाडूंचा समावेश आहे. यात महिला आणि पुरुष दोन्ही गटातील क्रिकेटर्सचा समावेश असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा द्विशतकी कामगिरी करणारा रोहित शर्मा (१५) तर भारतीय संघाला दोन विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ३५ वे स्थान देण्यात आले आहे. धोनीच्या पाठोपाठ रविंद्र जडेजा ३६ व्या स्थानावर असून भारताची महिला क्रिकेटर मिताली राज ४० व्या क्रमांकावर आहे. 
विराट कोहलीने या दशकात आंतरराष्ट्रीय सामन्यात इतर खेळाडूच्या तुलनेत सर्वाधिक २० हजार ९६० धावा केल्या आहेत. या दशकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली आणि अमला यांच्यात जवळपास ५ हजार धावांचे अंतर आहे.  

BLOG : पंतच्या प्रेमापोटी बीसीसीआयचा नवा प्रयोग

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच दशकात शतकांचे शतक करत विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. २०१३ मध्ये सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सचिनची बरोबरी कोणी करु शकेल का? असा प्रश्न नेहमी विचारला जायचा त्याच उत्तर कोहलीकडे पाहिल्यानंतर मिळते.  'द क्रिकेट' या मासिकाने पहिल्या दहामध्ये विराट कोहलीशिवाय जेम्स एंडरसन,  महिला क्रिकेटर एलिस पेरी, स्टीव्ह स्मिथ, हाशिम अमला, केन विलियमसन, एबी डिव्हिलियर्स, कुमार संगकारा, डेव्हिड वॉर्नर आणि डेल स्टेन यांना स्थान दिले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:uk magazine the cricketer chose team india s captaing virat kohli best cricketer of the decade ms dhoni rohit sharma not in the top 10 list