पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

६०० गोलसह मेस्सीची रोनाल्डोशी बरोबरी

मेस्सी आणि सुआरेझ

UEFA Champions League स्पर्धेत बार्सिलोना आणि लिव्हरपूल यांच्यात रंगलेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात सुआरेझने २६ व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते उघडून दिले. त्यानंतर मेस्सीने अवघ्या सात मिनिटात केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने कँम्प नाऊच्या मैदानावर लिव्हपूलला ३-० अशी मात दिली. आपल्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच बार्सिलोनाने लिव्हरपूरचा पराभव केला आहे. 

मेस्सीने गाठला ६०० गोलचा आकडा 

या सामन्यात मेस्सीने दुसरा गोल नोंदवत बार्सिलोनाकडून ६०० गोलचा जादूई आकडा गाठला. त्याने ७५ व्या मिनिटाला आपला सामन्यातील पहिला गोल नोंदवला तर ८२ व्या मिनिटाला दुसरा गोल डागत बार्सोलिनाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. मेस्सीने १४ वर्षांपूर्वी १ मे रोजी बार्सिलोनासाठी पहिला गोल नोंदवला होता. सुआरेझने नोंदवलेला गोलही बार्सिलोनासाठी खास होता. त्याने नोंदवलेला गोल बार्सिलोनाचा चॅम्पियन्स लीगमधील ५०० गोल ठरला.  

मेस्सीची रोनाल्डोशी बरोबरी

चॅम्पियन लीगमध्ये इंग्लंड क्लबच्या विरुद्ध ३३ सामन्यात मेस्सीने २६ गोल नोंदवले आहेत. कोणत्याही एका देशाच्या क्लब विरुद्ध सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. यापूर्वी जुव्हेन्टसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने जर्मनी क्लब विरुद्ध असा पराक्रम केला होता. 

बार्सिलोनाची १२ वर्षांची प्रतिक्षा संपली 

बार्सिलोनाने लिव्हरपूलला तब्बल १२ वर्षानंतर पराभूत केले. यापूर्वी २००७ मध्ये बार्सिलोनाने लिव्हरपूलच्या घरच्या मैदानावर त्यांना नमवले होते. दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या नऊ सामन्यात बार्सिलोनाचा हा तिसरा विजय आहे. लिव्हपूल विरुद्धच्या तीन सामन्यात त्यांना पराभूत पत्करावा लागला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.